वीकेंड हॉटेल
नेहा मुळे सकाळ
चील विथ कोल्ड कॉफी!
29/03/2019
ऊन्हाळ्यालाही कधी कधी धन्यवाद द्यावे वाटतात. कारण हाच खरा सीझन
असतो जेव्हा कोल्ड कॉफीचे घोट मनसोक्तपणे धेता येतात. नेहमीच्या
कडक चहा किंवा गरमागरम कॉफीच्या स्वादातून थोडं बाहेर पडून कोल्ड
घ
कॉफीकडे वळण्यासाठी उन्हाळा हे खरं तर चांगलं निमित्त आहे. अगदी संध्याकाळी किंवा
रात्री जेवण झाल्यावर वार्याच्या झुळकीबरोबर
रस्त्यावर उभा राहून कोल्ड कॉफी घ्यायची,
हा ट्रेडच आहे. या ट्रेडबरोबर सध्याच्या याच्याच
जोडीचा आणखी एक ट्रेड आहे तो कोल्ड ब्रुझ कॉफीचा. (तसा हा
कोल्ड कॉफीचाच प्रकार, पण बनवायची पद्धत मात्र निराळी.)
पुण्यातील सहज जाता येईल, खिशालाही परवडेल आणि कोल्ड,
कॉफीचा हवा तितका मनसोक्त आनंद घेता येईल, अशी काही ठिकाणं
पाहूयात..
दुर्गा कॉफी हाउस (पौड रोड) : कोल्ड कॉफीच पुणेकरांना
वेड लावलं ते या कॉफी हाउसनं. कोल्ड कॉफीला दुर्गाची कॉफी असं
म्हटलं जावं, इतकी तिथली कॉफी सर्वांना सवयीची आहे. कॉलेजनंतर,
ऑफिसनंतर किंवा सहज म्हणूनही दुर्गाला भेटायचं आणि कोल्ड कॉफी पीत
गण्या मारायच्या, असं अनेकांसाठी नेहमीच समीकरण आहे.